Translate

Friday, April 1, 2011

क्रिकेट...दिवाना बना दे !

मुंबईची हवा तशीही दरवर्षीपेक्षा यंदा जरा जास्तच गरम आहे आणि त्यात क्रिकेट फिवरनं भर घातलीयं. उद्या या सर्व जल्लोषाचा कळस होणार आहे. उद्याचा सामना पाहायला मिळावा म्हणून हर तऱ्हेचे प्रयत्न केले जाताय. सट्टेबाजी तर आहेच त्याच्या बरोबरीने तिकिटांची सौदेबाजी देखील जोरात चाललीयं.एकूणच भारतीयांचं क्रिकेट आणि सिनेमाचं खूळ कोणत्याही टोकाला जाऊ शकतं हे खरयं. अगदी जन्माला आल्यापासूनच बाळगुटीऐवजी भारतीयांना क्रिकेट आणि सिनेमाचं आसव पाजलं जातं की काय असा कोणीही बाहेरच्या माणसानं विचार करावा अशा प्रकारे प्रत्येकजण आपापलं ज्ञान पाजळत असतात. ते काहीही असलं तरी आपण सच्च्या दिलानं एन्जॉय करतो हे महत्वाचं ! क्रिकेटर्सवर तर आपले एवढं प्रेम की त्यांचा उदो उदो करण्यापासून ते अगदी त्यांच्या प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यापर्यंत मजल जाते. पण हेच क्रिकेटप्रेमी आता उद्या भारतालाच वर्ल्डकप मिळावा म्हणून देव पाण्यात टाकून बसतील. उद्याचा श्रीलंकेविरूद्धचा सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नाही आणि तसं बघता कोणत्याही संघानं हा सामना जिंकला तरी शेवटी वर्ल्डकप आशिया खंडातच राहणार यात थोडे तरी समाधान मानून घ्यायला हरकत नाही. तेव्हा उद्याच्या सामन्यासाठी  सर्व भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा :)

No comments:

Post a Comment