Translate

Friday, July 30, 2010

राहगुजर



अनेक दिवस मनात एखादा तरी ब्लॉग लिहावा असे विचार येत होते. सुरुवात कशी आणि कुठून करावी हा प्रश्न कधीच नव्हता. 'राहगुजर' नाव देखील तसे अचानकच सुचलं  पण या ब्लॉगची भाषा कोणती असावी हा एक प्रश्न होता. तोही लगेच सुटला, ठरवलं की ब्लॉग तिन्ही भाषांमध्ये लिहायचा. असे ब्लॉग जे लिहिताना, विचार व्यक्त करताना भाषेचा कोणताही अडसर राहणार नाही. जी मनात येईल ती भाषा वापरायची,अगदी कोणतीही ! खरं  तर हा  ब्लॉग माझ्यासाठीच जास्त असेल कारण लिहिण्याची सवय सुटू नये हा यामागचा एक स्वार्थी  हेतू आहेच. शिवाय डोक्याची किंवा मनाची हार्ड डिस्क भरत आली की इथं रिकामी करायची हा दुसरा हेतू . शक्यतो शुद्धलेखनात फारश्या चुका राहणार नाहीत याची खबरदारी घेऊन लिहायचंय, पण आपण काही प्रकाण्डपंडित नसलो तरी हा ब्लॉग वाचताना वाचक अडखळणार नाहीत एवढी मात्र काळजी घेणार आहे. विषय कोणताही असेल, जिथं मला व्यक्त व्हावं असे
वाटेल असा कोठलाही...स्वभाव फिरस्ता आहे आणि पेशा पत्रकाराचा तेव्हा विषयाला बंधन नसेलच. अर्थात याचा अर्थ असाही नाही की वाटेल ती टीका करण्यासाठी या ब्लॉग स्पेसचा वापर होईल. निरिक्षण आणि फिरण्याचा छंद असल्यामुळे त्यातून जे काही मनात येईल ते लिहिण्यासाठी हा सर्व ब्लॉगप्रपंच :) भेटुयात पुढल्या ब्लॉगमध्ये..तुमचा उद्याचा दिवस आनंदी असेल या शुभेच्छा आणि जाता जाता हे तुमच्यासाठी...Goodnight !

http://www.youtube.com/watch?v=rr7LoL3tkaI